दादापाटील राजळे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने सातवा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला सदरील कार्यक्रमाला प्रमुखपाहुण्या म्हणून आदरणीय लोकनेत्या आमदार मोनिकाताई राजीव राजळे उपस्थित होत्या त्या समवेत श्री.अशोकराव चोरमले, डॉ. मृत्युंजय गरजे, श्री. विष्णूपंत आकोलकर, सौ.मंगलाताई कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी बोलताना मा. आ. मोनिकाताई राजीव राजळे यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि आजच्या काळात आरोग्य चांगले राखण्यासाठी योग हे संजीवनी चे काम करत आहे असेत्यांनी सांगितले तसेच आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमित योग करणे गरजेचे आहे असेही त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. जे. टेमकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमामध्ये कोविडचे सर्व नियम पाळून सर्वांनी योग प्रात्यक्षिकामध्ये सहभाग घेतला. महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. रोहित आदलिंग आणि एन.आय.एस कोच श्री. श्याम नागरगोजे यांनी आयुष मंत्रालयाकडून योगा डे साठी देण्यात आलेल्या प्रोटोकॉल नुसार योगाची सर्व प्रात्यक्षिके करुन दाखवली.सदरील कार्यक्रमांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपला सहभाग नोंदविला. याशिवाय महाविद्यालयाने योग दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावर ती प्रश्नमंजुषा आयोजित केली होती संपूर्ण भारतातून यामध्ये १३७९ जणांनी सहभाग नोंदविला. त्याचबरोबर योगा डे च्या ऍक्टिव्हिटी मध्ये ऑनलाइन ५० जणांनी आपला सहभाग नोंदविला ज्यामध्ये त्यांनी स्वतः योगासन करत असलेले फोटो किंवा व्हिडिओ गुगल फॉर्म द्वारे महाविद्यालय मध्ये पाठवले. सदरील कार्यक्रमाचे प्रा. रोहित आदलिंग व प्रा. आसाराम देसाई यांनी समन्वयक म्हणून काम बघितलेतर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. उमेश तिजोरे प्रा. असलम शेख यांनी सहकार्य केले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर टेमकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन केले.