विद्यार्थ्यांनी बदलत्या जगासोबत स्वतः मधे बदल केला तर यशस्वी होता येते.-टेरेन्स नेरो.

विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना टेरेन्स नेरो

दादापाटील राजळे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात संगणकशास्र विभागाच्या वतीने शनिवार दि.२२/१०/२०२२ रोजी संगणकशाखेच्या विद्यार्थ्यंनकरिता “माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील संधी” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर व्याख्यान देण्याकरिता एल. & टी. इंन्फोटेक पुणे येथील प्रिन्सिपल इंजिनीयर टेरेन्स नेरो यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. एकविसाव्या शतकात भारत हा देश आधुनिकतेच्या दिशेने यशस्वी वाटचाल करत आहे त्यामुळे बाहेरील विदेशी कंपनीची भारतामध्ये होत असलेली गुंतवणूक यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहे. या बदलामुळे विद्यार्थ्याने रोज नवनवीन तंत्रज्ञान शिकले पाहिजे असे नेरो यांनी या प्रसंगी सांगितले. सदर कार्यक्रमाकारीता अहमदनगर येथील एम.बी.ए.काँलेज चे प्रा. विजय शिंदे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रा. शिंदे सर यांनी विद्यार्थ्याना वाचनातून आपले व्यक्तिमत्वचा विकास कसा करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजधर टेमकर, कार्यालयीन अधीक्षक श्री विक्रमराव राजळे सर, संगणकशास्र विभाग प्रमुख प्रा. चंद्रकांत पानसरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रा. अंकिता इंगळे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. योगिता इंगळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. आंजुम सय्यद, प्रा. तेजस्विनी राजळे, प्रा.संजय म्हस्के प्रा.अस्लम शेख श्री योगेश वावरे, श्री विष्णु साप्ते यांनी सहकार्य केले.

Leave a Reply