जागतिक चिमणी दिवसा निमित्त दादा पाटील राजळे महाविद्यालयातर्फे श्री. जयराम सातपुते यांचा सन्मान

दिनांक 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आदिनाथनगर येथील दादापाटील राजळे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय विद्यालयात प्राणीशास्त्र विभाग, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, सायन्स असोसिएशन, डॉ. सलीम अली ओरनॕथोलॉजिकल क्लब व अहमदनगर निसर्गप्रेमी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला. आज पर्यावरणात निर्माण झालेल्या असमतोलामुळे निर्माण होणारा भविष्यातील धोका टाळण्यासाठी चिमण्यांचे संवर्धन करणे किती गरजेचे आहे व अगदी छोट्या छोट्या उपक्रमांपासून आपण सुरुवात करू शकतो. असा संदेश देणारा एक अभिनव उपक्रम प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने महाविद्यालयात राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत टाकाऊ पासून टिकाऊ या संकल्पनेतून पशुपक्ष्यांसाठी धान्य व पाण्याची सोय व्हावी म्हणून तेलाच्या रिकाम्या डब्या पासून घरटी तयार करण्यात आली व महाविद्यालयाच्या परिसरात चिमण्यांच्या सोयीसाठी टांगण्यात आली

याप्रसंगी प्राणीशास्त्र विभाग व अहमदनगर निसर्गप्रेमी मंडळ यांच्याकडून ठिक-ठिकाणी स्पॅरो हाऊस व बर्ड फीडरसुद्धा लावण्यात आले. याप्रसंगी जागतिक वन्य दिवसाचे औचित्य साधून पहिल्या राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेचे आयोजन व प्रदर्शन प्राणीशास्त्र विभागामार्फत करण्यात आले. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून सुमारे १५० छायाचित्रे विद्यार्थी, शिक्षक व निसर्गप्रेमी यांच्याकडून पाठविण्यात आली. या स्पर्धेचे आयोजन करण्याचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग संवर्धन व संरक्षण करणे व त्यांमध्ये जिज्ञासा निर्माण करणे हा होता. या छायाचित्रांचे निरीक्षण व परीक्षण महाविद्यालयाचे आय क्यू ए सी समन्वयक प्रा. राजू घोलप, प्रा. रोहित आदलिंग व निसर्ग अभ्यासक श्री. जयराम सातपुते यांनी केले . या स्पर्धेमध्ये विविध गटांमधून उत्कृष्ट छायाचित्रांसाठी अनिल साखरे, नांदेड, मंदार साबळे , पूणे, मुन्ना सोमानी, अंबेजोगाई, गंगाराम लेंडवे, रायगड, सुधीर सोनवणे, अहमदनगर, प्रिया उनवणे , आदिनाथनगर, प्रिया जाधव , अमरावती, प्रियंका गवळी, शेवगाव, तुषार उंडेगावकर, नाशिक, अनिल भावसार, अहमदनगर, ओंकार तरकासे, अहमदनगर, प्रतीक्षा तायडे, औरंगाबाद यांची निवड करण्यात आली. तसेच या जागतिक चिमणी दिवसा निमित्त अहमदनगर जिल्ह्याचे निसर्गप्रेमी शिक्षक व युवा संशोधक श्री. जयराम श्रीरंग सातपुते यांचा महाविद्यालयाच्या वतीने त्यांनी संशोधित केलेल्या ‘कुमुदिनी निम्फिया स्काय-जय’ या प्रजातीस आंतरराष्ट्रीय स्तरावर इंटरनॅशनल वॉटर लिली लिली अँड गार्डनिंग सोसायटी या संस्थेकडून मान्यता मिळाल्याबद्दल त्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजधर टेमकर व श्री. विक्रम राजळे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या सन्मानाचा उद्देश महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती निर्माण व्हावी तसेच अहमदनगर जिल्ह्यातील तरूण संशोधकांचा गौरव करणे हा होता अशी माहिती प्राचार्य डाॕ. राजधर टेमकर यांनी दिली. सन्मानमूर्ती श्री. जयराम सातपुते यांनी त्यांच्या संशोधनाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली तसेच कोणतेही काम सातत्याने व प्रामाणिकपणे केले तर निश्चितच यश प्राप्त होते असे सांगून त्यांनी चिमणी संवर्धन एक काळाची गरज आहे असे अधोरेखित केले. विज्ञान विभाग प्रमुख प्रा. डॉ. जनार्दन नेहुल यांनी दुर्मिळ होत चाललेले चिमण्यांचे संवर्धन करणे व त्यासंदर्भात विविध उपक्रम आयोजित करणे गरजेचे आहे असे सांगितले. भूगोल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. गंगाधर लवांडे यांनी जैवविविधतेसाठी भौगोलिक परिस्थितीचे आकलन व त्यानुसार पर्यावरण संवर्धन करणे खूप गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. पैठण येथील निसर्ग अभ्यासक श्री . सुनिल पायघन यांनी या स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल संयोजकांचे अभिनंदन केले व भविष्यामध्ये पशुपक्षी संवर्धनासाठी आणखी विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे व सर्वांना यामध्ये सामील करून घ्यावे असे सांगितले. प्रा. डॉ. महबुब तांबोळी, प्रा. डॉ. सुभाष देशमुख यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या . या कार्यक्रमाचे आयोजन प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. अतुलकुमार चौरपगार यांनी केले होते तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजन करिता प्रा. विकास क्षिरसागर, प्रा. अनुजा राजळे प्रा. धनेश्वरी मस्के, श्री . चंद्रशेखर उबाळे, प्रा. डॉ. किशोरकुमार गायकवाड, प्रा. आसाराम देसाई, प्रा. असलम शेख, प्रा. चंद्रकांत पानसरे, भाग्यश्री वांढेकर , तेजस्विनी मोरे , पल्लवी शिंपी, प्रदीप कचरे, तुषार बर्डे, शुभम बोरुडे आफताप शेख, गायत्री क्षिरसागर, आकांक्षा काळे आधी विद्यार्थ्यांनी मदत केली .