पाथर्डी तालुक्याचे भाग्यविधाते सहकार व शिक्षण महर्षी स्व. दादापाटील राजळे (भाऊ) यांचे १५ वे पुण्यस्मरण निमित्त दादापाटील राजळे महाविद्यालयात शेवगाव- पाथर्डी तालुक्याच्या मा. आमदार लोकनेत्या मोनिकाताई राजीव राजळे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिक्षण संस्थेचे विश्वस्त मा. श्री उद्धवराव वाघ यांनी स्व. भाऊंच्या कार्याला व आठवणींना उजाळा दिला. स्व. दादापाटील राजळे यांनी शिक्षण संस्था व वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना काढताना घेतलेले कष्ट तसेच परिसरातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय होण्यासाठी भाऊंची असलेली तळमळ त्यांनी उपस्थितांसमोर व्यक्त केली.
मा. आमदार मोनिकाताई राजीव राजळे यांनी स्व. भाऊंच्या ध्येयनिष्ठा व कर्तव्यपूर्ती याबद्दलचे स्व. भाऊंचे जीवनानुभव सांगितले. या कार्यक्रमासाठी शिक्षण संस्थेचे विश्वस्त मा. श्री. रामकिसन काकडे, मा. श्री राहुलजी राजळे, मा. श्री सुभाष ताठे, मा. श्री सुभाष बुधवंत, मा. ॲङ अनिल फलके, मा. श्री. शेषराव ढाकणे, डॉ. यशवंतराव गवळी व इतर विश्वस्त तसेच संस्थेचे सचिव मा. जे. आर. पवार, मा. श्री आर वाय म्हस्के, मा. श्री वसंतराव भगत हे उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. टेमकर यांनी केले तर आभार एन एस एस कार्यक्रम आधिकारी प्रा. आसाराम देसाई यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र इंगळे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. एस आर भराटे, डॉ. साधना म्हस्के, प्रा. रोहित अदलिंग, प्रा. अरुण भोर, प्रा. असलम शेख व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.