लोकनेते स्वर्गीय राजीवजी राजळे यांचे चौथे पुण्यस्मरण निमित्त दादापाटील राजळे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात स्मृतिवंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोरडगाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन मा. श्री नारायण तात्या काकडे हे होते. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. टेमकर यांनी स्वर्गीय भाऊंच्या स्मृतीस उजाळा दिला. महाविद्यालयाची उभारणी व महाविद्यालयाचा विकास यासाठी भाऊनी केलेले प्रयत्न त्यांनी सांगितले. यावेळी श्री. वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मा. श्री. रामकिसन काकडे यांनी भाऊंचे विचार आज कसे प्रत्ययास येत आहेत हे सांगितले. कारखान्याचे संचालक मा. श्री. चारुदत्त वाघ यांनी स्वर्गीय भाऊंनी राजकारण करत असताना समाज हिताला कसे महत्त्व दिले, याबद्दलचे प्रसंग उपस्थितांना सांगितले. तर पंचायत समिती सदस्य मा. श्री सुभाष केकान यांनी त्यांच्या सारख्या तरुण राजकारण्यांना घडविण्यासाठी भाऊंनी केलेले मार्गदर्शन याविषयी माहिती दिली व उपस्थितांना भाऊंचे विचार व कार्य पूर्णत्वास नेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष मा. श्री. माणिक खेडकर, माजी सभापती विष्णुपंत अकोलकर मा श्री. काकासाहेब शिंदे, श्री. वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा. श्री बाबासाहेब किलबिले मा. श्री. श्रीकांत मिसाळ मा. श्री. महादेव जायभाय, मा. श्री. भास्करराव गोरे तसेच, मा.श्री.संदीप पठाडे, मा. श्री. जमीर आतार, मा.श्री. सचिन नेहूल, मा.श्री.पोपटराव कराळे, मा. श्री. नंदू एडके इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र इंगळे यांनी केले तर आभार प्रा. अशोक काळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्टाफ सेक्रेटरी प्रा. आसाराम देसाई व प्रा. शामराव गरड याचबरोबर सर्व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यानी परिश्रम घेतले.